आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch: Aamir Khan, Anushka Sharma On 'PK' Poster

'PK' Release: आमिरचे विवस्त्र पोस्टर रिलीज होताच फुटले होते वादाला तोंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके'च्या पोस्टरवर आमिर खान)
मुंबई- आज बॉक्स ऑफिसवर या वर्षीचा बहूप्रतिक्षीत 'पीके' सिनेमा रिलीज झाला आहे. आमिरच्या गेटअप, अभिनयापासून सिनेमाचे टीजर, पोस्टरसुध्दा चर्चेत राहिले आहेत.
'पीके'च्या पहिल्या पोस्टरवर आमिर विवस्त्र दिसला होता. गळ्यात ट्रान्झिस्टर अडकवून आमिर रेल्वे ट्रॅकवर उभा दिसत होता. या पोस्टरवर बराच विवाद झाला होता. एवढेच नव्हे, आमिरच्या या पोस्टर विरोधात कोर्टात याचिकासुध्दा दाखल करण्यात आली होती. या वादानंतर 'पीके'ला खूप प्रसिध्दी मिळाली होती. त्यानंतर अनेक पोस्टर रिलीज झाले. इतर पोस्टर्सवर आमिर खानसोबत संजय दत्त आणि अनुष्का शर्मासुध्दा दिसली होती.
सिनेमाच्या प्रत्येक नवीन पोस्टरवर सिनेमाचे स्टार्स न्यू लूकमध्ये दिसले होते. अनुष्कासोबत आमिर सर्वात जास्त पोस्ट रिलीज करण्यात आले. पोस्टरवर फनी लूकमध्ये दिसली होती. एकूणच सिनेमाच्या पोस्टरने भरभरून प्रसिध्द मिळवली. आमिरने या पोस्टर्ससह काही मजेदार
टि्वट्ससुध्दा केले होते.
आमिरचे टि्वट-
Ei Layo, ab dekha PK ka humra naya posterwa!!!.
Lull Sala!!! Galti ho gawa. Mishtake se hum apna teebhi ka porograam ka ad-wa daal diya.
Ei dekha... PK ka humra naya adbhurteesmant... dekha aur bola... kaisan laaga?

आतापर्यंत रिलीज झालेल्या 'पीके'च्या पोस्टर्समधून आम्ही तुम्हाला काही निवडक पोस्टर्स दाखवत आहोत. पीकेचे पोस्टर्स पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...