मुंबई: बॉलवूडचा सुपरस्टार अजय देवणगचा 'अॅक्शन जॅक्सन' या आगामी सिनेमाचा दुसरे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. अजयने हे पोस्टर सोशल साइट्सवर अपलोड केले आहे. या पोस्टरमध्ये अजय म्हणतो, 'मै एक ही बार बोलता हू, क्योकी दुसरी बार सुनाने के लिए तू नही बचेगा. इट्स माय वे और स्काय वे. ना कमीटमेन्ट ना अपॉइंटमेन्ट ओन्ली पनीशमेंट'. अर्थातच या सिनेमात तो राऊडी अवतारात दिसणार आहे.
'अॅक्शन जॅक्सन' प्रभू देवाने दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी सिनेमाचा एक धमाकेदार अॅक्शनचा ट्रेलर रिलीज झाला होता. सिनेमात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. येत्या 5 डिसेंबरला सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे दुसरे मोशन पोस्टर...