आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी अभिनेत्रीच नव्हे, प्रसिध्द मासिकांची कव्हर गर्लसुध्दा आहे दीपिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दीपिका पदुकोण)
मुंबई- प्रत्येक वर्षी आपल्या पदरी यश मिळवणारी दीपिका पदुकोणसाठी मागील वर्षसुध्दा लकी ठरले. ती अभिनयासोबतच रणवीर सिंहसोबतच्या रिलेशनशिपने आणि इतर बातम्यांनीसुध्दा चर्चेत आली होती. 5 जानेवारी 2015 रोजी दीपिका 29 वर्षांची होणार आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्या 8 वर्षांपासून सक्रिय असलेली दीपिका सुपरहिट अभिनेत्रींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'ऐश्वर्या' या कन्नडी सिनेमातून केली होती. परंतु बॉलिवूडमध्ये 2007मध्ये आलेल्या 'ओम शांती ओम' सिनेमातून तिने एंट्री घेतली होती. या सिनेमात दीपिकाने आपले कौशल्य लोकांना दाखवले. दीपिकाने आतापर्यंत हिंदी तसेच तामिळ आणि इंग्रजी सिनेमांमध्ये तब्बत 20 सिनेमे केले आहेत. तिने एकापाठोपाठ 'रेस 2', 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'गोलियो की रासलील राम-लीला' आणि 'कोचडयान' सुपरहिट सिनेमे दिले होते. या यशस्वी सिनेमांने ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली.
फोटोशूटमधून मिळाली लोकप्रियता-
दीपिकाने अभिनयाच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. याचा फायदा तिला अनेक मासिकाने उचलला. दीपिकाची प्रसिध्दीला पाहून Maxim, People, FHM, Eastern Eye (UK magazine), Filmfare, Bazaar, Vouge, Famina, l'officielसह अनेक मासिकांनी तिला कव्हर पेजवर जागा दिली. दीपिका या मासिकावर हॉट आणि ग्लॅमरस अवतारामध्ये दिसली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा विविध मासिकासाठी दीपिकाने पादुकोणने केलेले फोटोशूट...