(फोटोशूटदरम्यान अक्षय कुमार आणि पत्नी टि्वंकल खन्नासोबत)
मुंबई- अक्षय कुमारने पत्नी टि्वंकल खन्नासोबत एक फोटोशूट केले आहे. या कपलने हे फोटोशूट 'हॅलो' (Hallo) मासिकासाठी केले आहे. सेलिब्रिटी लाइफ, सेलेब बेबीज, वेडिंग्ससह अनेक गॉसिप्सवर लक्ष केंद्रीत करून या मासिकाने नोव्हेंबर महिन्यासाठी हा अंक काढला आहे.
या फोटोशूटदरम्यान अक्षय-टि्वकलची रोमँटिक केमिस्ट्री दिसली. फोटोशूटसाठी या कपलने ट्रॅडिशनल कपडे परिधान केले होते. टि्वंकल ब्लू-गोल्डन रंगाच्या लहंगामध्ये दिसली. हा लहंगा अबू जानी आणि संदीप कोसलाने डिझाइन केले होता. फोटोशूटसाठी अक्षय पांढरा कुर्ता-पायजामा गेटअपमध्ये दिसला. तसेच, विविध ड्रेस परिधान करूनसुध्दा या कपलने पोज दिल्या. मासिकाचा हा अंक दुल्हन स्पेशल असून त्यामध्ये इतर जोड्यासुध्दा असतील असे सांगण्यात येत आहे.
फोटोशूटदरम्यान रोमँटिक झाले अक्षय-टि्वंकल
फोटोशूटदरम्यान अक्षय-टि्वंकलला रोमँटिक पोज द्यायच्या होत्या. दोघांही हे शॉट्स देताना रोमँटिक झालेले दिसले. दोघांना रोमँटिक पोज देताना हसूदेखील येत होते.
अक्षय-टि्वंकल 17 जानेवारी 2001 रोजी लग्नगाठीत अडकले. दोघांच्या लग्नाता 13 वर्षे पूर्ण झालीत. दोघांना मुलगा आरव आणि मुलगी नितारा ही मुले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोशूटदरम्यान अक्षय-टि्वंकलचे रोमँटिक क्षण...
सोर्स- हॅलो (Hallo)