आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा आशुतोष राणाच्या 'येडा'चा FIRST LOOK

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 'येडा' या मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमाद्वारे संघर्ष, दुश्मन या सिनेमांमध्ये सायको, विक्षिप्त धाटणीचं पात्र साकारणारा अभिनेता आशुतोष राणा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात आशुतोष राणा आप्पा कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत आहे.

किशोर बेळेकर दिग्दर्शित या सिनेमात आशुतोष यांच्यासह रिमा, प्रज्ञा शास्त्री, अनिकेत विश्वासराव, सतीश पुळेकर, किशोरी शहाणे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

थ्रिलर आणि सस्पेन्स तडका असलेल्या 'येडा' या सिनेमाचा फर्स्ट लूक बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...