आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 6 बहीण-भावांमध्ये धाकटा आहे गोविंदा , पाहा पर्सनल Life Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- स्वर्गीय आई निर्मला देवींसोबत गोविंदा)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता गोविंदा 51 वर्षांचा झाला आहे. 'किल दिल' आणि 'हॅपी एंडिंग' सिनेमातून त्याने पुनरागमन केले आहे. दोन्ही सिनेमांत त्याच्या कामाची प्रशंसा झाली. दिर्घकाळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या गोविंदाचे डबल कमबॅक कितपत यशस्वी ठरते हे येणारा काळच सांगेल.
एकेकाळी चीची अर्थातच गोविंदा आपल्या डान्स आणि कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. गोविंदा जेव्हा बॉलिवूडमध्ये आले तेव्हा अॅक्शन आणि रोमान्स काळ होता. त्यावेळी कॉमेडी करण्यात कोणताच हिरो असा नव्हता जो मुख्य भूमिका साकारेल. परंतु गोविंदाने अशाच अंदाजात एंट्री घेतली आणि आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवले. त्याचे 'हीरो नंबर वन', ‘कुली नंबर 1’ 'राजा बाबू', 'आँखे', 'आन्टी नंबर वन', 'पार्टनर'सारख अनेक कॉमेडी सिनेमे आजसुध्दा प्रेक्षकांना हसायला लावतात.
6 बहीण-भावामध्ये धाकटा आहे गोविंदा-
गोविंदाला 5 बहीण आणि भाऊ आहेत. तो घरात सर्वात लहान आहे. सांगितले जाते, की धाकटा असल्याने तो आपल्या आईच्या खूप जवळ होता. तो रोज आपल्या आईचे पाय धूवुन पाणी प्यायचा.
पहिल्या पगारात आईला घेतली होती साडी-
गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते, की वयाच्या 14-15व्या वर्षीच त्याने काम करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्मात्यांकडे काम मागण्यास जायचा. दिग्दर्शक त्याला तू छोटा आहेस, तुझ्यासारखे काम असल्यास सांगू असे म्हणून काढून देत. त्याच्या पहिल्या कामाचा चेक साडे चार हजार होता. त्याने त्या पैशाने आईसाठी साडी खरेदी केली आणि काही मिठाईचे डब्बे घेतले होते.
कदाचित, त्याच्या आईच्या आशिर्वादानेच गोविंदाला आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी मदत केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाचे कुटुंबीय आणि इतर छायाचित्रे...