आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch New Avatars Of Vidya Balan In Bobby Jasoos Trailer

\'बॉबी जासूस\'चा TRAILER OUT, बघा जासूस विद्याची विविध रुपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन पुन्हा एकदा आपल्या नवीन अवतारात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी 'बॉबी जासूस'सह सज्ज झाली आहे. दिर्घकाळानंतर सिनेमामध्ये विद्याची एक झलक बघण्यासाठी सर्वजण उत्सूक झाले आहेत. तिच्या 'बॉबी जासूस'चा अलीकडेच ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये विद्या वेग-वेगळ्या अवतारात दिसत आहे. 'बॉबी जासूस' हा एक थ्रिलर सिनेमा आहे हे त्याच्या नावावरून स्पष्ट होते. परंतु यामध्ये कॉमेडीची फोडणीसुध्दा देण्यात आली आहे. सिनेमामध्ये विद्या 'बॉही जासूस'च्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरूवात अनेक पात्र बॉबीला शोधण्यापासून सुरू होते.

विद्याला दिले 10पेक्षा वेग-वेगळे लूक
ट्रेलर जस-जसा पुढे जातो तशी त्याबद्दल उत्सूकता वाढते. ट्रेलर बघूनच विद्याच्या कलाकारीचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'बॉबी जासूस'मध्ये विद्याला 10पेक्षा जास्त लूक देण्यात आले आहेत.
विद्या सिनेमाला 'ड्रॅमिडी' करार देत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा बघण्यास खूप मज्जा येणार आहे. तिचे पात्र या सिनेमात 'घनचक्कर'सारखे नाहीये. विद्या स्व:बळावर प्रेक्षकांना तिकीट खिडकीवर आणण्यास उत्साही करते. आपल्या हिम्मतीवर सिनेमा हिट करण्याची ताकिद तिच्यात आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या 'कहानी' सिनेमाचा धूरा एकट्या विद्याच्या खांद्यावर होता.
सिनेमाचे ट्रेलर लाँचवर विद्या म्हणते, की सिनेमाचा भाग होणे तिच्या नशीबातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. सिनेमासाठी विद्याने खूप मेहनत घेतली आहे. आपल्या पात्राला जिवंतपणा देण्यासाठी विद्याने रिअल लाइफमधील महिला गुप्तहेरांचा अभ्यास करून त्यांचे जवळून अनुभवायाचा प्रयत्न केला.
ट्रेलरमध्ये कॉमेडी शोमधील चेहरेही झळकले
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सब टीव्हीवर प्रसारित होणारे कॉमेडी शोमधील अनेक चेहरेसुध्दा दिसत आहेत. स्पष्ट आहे, की हा सिनेमा थ्रिलर तर आहेच, सोबतच प्रेक्षकांना कॉमेडीसुध्दा ऐकायला मिळणार आहे. सिनेमा समर शेखने दिग्दर्शित केला असून 4 जुलै रोजी हा थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा विद्या बानलचे सिनेमामधील विविध अवतार आणि सिनेमाचा ट्रेलर...