('हॅपी एंडिंग'चे पहिले पोस्टर)
मुंबईः
सैफ अली खान, गोविंदा आणि इलियाना डिक्रूज स्टारर हॅपी एंडिंग या सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला. सोबतच सिनेमाचे पहिले पोस्टरसुद्धा लाँच करण्यात आले (वर तुम्ही पाहू शकता). हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. यामध्ये सैफने हॉलिवूड लेखक यूडी आणि गोविंदाने एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे.
सिनेमात इलियानासुद्धा अभिनेत्रीच्या रुपात झळकणार आहे. गोविंदा,
सैफ अली खान आणि इलियाना यांच्याव्यतिरिक्त कल्कि कोचलिन, रणवीर शौरी, प्रिती झिंटा आणि
करीना कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. रंजक गोष्ट म्हणजे
साजिद खानच्या
हमशकल्स या सिनेमात तिहेरी भूमिकेत झळकलेला सैफ या सिनेमातसुद्धा दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या दुस-या पात्राचे नाव योगी असेल. येत्या 21 नोव्हेंबर रोजी सिनेमा
बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा 'हॅपी एंडिग'चा ट्रेलर...