आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Are Busy Preparing For Arpita’S Wedding, Says Salim Khan

सलमान करणार बहिणीला फ्लॅट गिफ्ट, जानेवारीत बोहल्यावर चढणार अर्पिता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अर्पिता खान)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिताचे पुढील वर्षी 26 जानेवारीला लग्न ठरले आहे. आतापासूनच तिच्या लग्नाची तयारी खान कुटुंबात सुरु झाली आहे. अर्पिता तिचा दिल्लीस्थित बॉयफ्रेंड आयुष शर्मासह लग्नगाठीत अडकणार आहे. अर्पिता, सलीम खान आणि हेलन यांची दत्तक मुलगी आहे. हे दोघेही आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीत सध्या बिझी आहेत.
अर्पिताच्या लग्नाविषयी सलीम खान यांनी सांगितले, "माझ्या मुलीचे लग्न ठरल्यामुळे मी खूप आनंदी आहे. अर्पिता माझी सर्वात लहान मुलगी आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण तिच्या लग्नाविषयी खूप खुश आहोत. ती लग्न करुन सासरी गेल्यानंतर आम्ही सर्वजण तिला खूप मिस करणार आहोत. सध्या आम्ही वेडिंग शॉपिंगमध्ये बिझी आहोत. अद्याप तिच्या लग्नाला चार
महिने शिल्लक आहेत, त्यामुळे आत्ताच त्याविषयी बोलणे घाऊ होईल."
अर्पिताची आई हेलनसुद्धा आपल्या मुलीच्या लग्नासाठी खूप उत्साही आहेत. त्या म्हणाल्या, कुटुंबातील सर्वच लोक अर्पिताच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहोत. आयुष अर्पिताची पसंत असून तो खूप चांगला मुलगा आहे. तो तिची नीट काळजी घेईल, असेही हेलन म्हणाल्या.
तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान आपल्या लाडक्या बहिणीसाठी मुंबईत एका थ्री बीचएके फ्लॅटच्या शोधात आहे. लग्नाची भेट म्हणून सलमान तो अर्पिताला देणार आहे. अरबाज आणि सोहेलसुद्धा आपल्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्पिताचे लग्न होणार असल्याची चर्चा असून तिच्या लग्नाला बॉलिवूडमधील बरीच मंडळी उपस्थित राहणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अर्पिताची तिच्या बॉयफ्रेंड आणि कुटुंबासोबतची खास छायाचित्रे...