आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Album Of Saif Ali Khan And Kareena Kapoor

सैफ-करीनाच्या लग्नात सहभागी झाले होते अनेक CELEBS, पाहा वेडिंग अल्बम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, सैफ-करीना आणि लग्न समारंभात पोहोचताना पत्नी गौरीसह शाहरुख खान)
मुंबई - अभिनेता सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या भलतीच खुशीत आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात रिलीज झालेला तिचा सिंघम रिटर्न्स हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करतोय. रिलीजच्या केवळ तीन दिवसांत या सिनेमाने 77 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. करीनाचे मागील रिलीज झालेले सिनेमे सपशेल आपटले होते. ब-याच दिवसांनी तिला या सिनेमाच्या निमित्ताने यशाची चव चाखायला मिळाली आहे.
लग्नानंतरचा हिट ठरलेला करीनाचा हा पहिलाच सिनेमा आहे. 2012 मध्ये करीनाने सैफसह लग्न केले होते. सैफचे करीनासोबतचे हे दुसरे लग्न आहे. 16 ऑक्टोबर रोजी दोघांनी कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत बॉलिवूडसह बिझनेस आणि राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
बॉलिवूडमधून शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी, रणबीर कपूर, संजय कपूर, प्रिती झिंटा, मधुर भंडारकर, नंदिता दास, डिजाइनर मनीष मल्होत्रा, सहारा प्रमुख सुब्रत राय सहारा, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, पॉलिटिशियन शशी थरूर आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक मंडळींचा सहभाग होता. सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुले (इब्राहिम आणि सारा अली खान)सुद्धा या लग्नात सहभागी झाले होते.
ऑक्टोबर 1991 मध्ये सैफने अभिनेत्री अमृता सिंहसह लग्न केले होते. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला होता. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर करीनासह सैफची जवळीक वाढली आणि चार वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सैफ आणि करीनाच्या वेडिंग रिसेप्शनची निवडक छायाचित्रे...