आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7th Wedding Ann: संजयची तिसरी पत्नी आहे मान्यता, लग्नाला दोन्ही बहिणींचा होता विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संजय आणि मान्यताचे त्यांच्या लग्नातील छायाचित्र)
अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या लग्नाचा आज सातवा वाढदिवस आहे. 11 फेब्रुवारी 2008 रोजी एका खासगी समारंभात संजयने मान्यताचा आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रुपात स्वीकार केला होता. आजच्या या खास दिवशी संजय तुरुंगात असून मान्यता त्याला भेटायला पुण्याच्या येरवडा तुरुंगात गेली आहे.

लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. देवळातल्या दर्शनापासून ते पार्ट्यांपर्यंत हे दोघे एकत्र दिसायचे. यांच्या लग्नाला संजयच्या दोन्ही बहिणी म्हणजे प्रिया आणि नम्रता दत्त यांनी विरोध दर्शवला होता. शिवाय संजयची थोरली मुलगी त्रिशाला दत्तसुद्धा या लग्नामुळे आनंदी नव्हती.
कसे झाले लग्न ?
2008 मध्ये लग्न होण्यापूर्वी संजय आणि मान्यता दोन वर्षे डेटिंग करत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. त्यांचे लग्न अगदी खासगीरित्या झाले होते. या लग्नात संजयचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते. सुनील शेट्टी आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नात हजर होता. संजयचे मान्यतासोबतचे हे तिसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे लग्न रिचा शर्मा आणि रिया पिल्लईसह झाले होते. संजयच्या पहिली पत्नी रिचाचे निधन झाले होते. तर दुसरी पत्नी रियासह त्याचा घटस्फोट झाला आहे. संजय आणि मान्यता यांना जुळी मुले असून मुलाचे नाव शहरान आणि मुलीचे नाव इकरा आहे.
कोण आहे मान्यता ?
मान्यताला बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री व्हायचे होते. मात्र काही बी ग्रेड सिनेमे आणि आयटम साँगपर्यंतच तिचे करिअर मर्यादीत राहिले. संजयसह भेट झाल्यानंतर तिेने आपल्या करिअरला ब्रेक लावला. मान्यताचे संजयसोबतचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये तिचे लग्न मेराई उल रहमान नावाच्या व्यक्तिसोबत झाले होते. याशिवाय मान्यता आणि रहमान यांना एक मुलगा असून तो दुबईत मान्यताच्या नातेवाईकांकडे असतो.

संजय आणि मान्यताच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तु्म्हाला त्यांच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.