आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे सलमानच्या बहिणीची लग्नपत्रिका, पाहा INSIDE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सलमान खानच्या बहिणीची लग्नपत्रिका)
अर्पिता आणि आयुष यांचे वेडिंग कार्ड सिंपल आणि सोबर दिसत आहे. व्हाइट, गोल्डन आणि पिंक कलरच्या या कार्डसोबत पाहुण्यांना मिठाई देण्यात येत आहे.
येत्या 18 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता बोहल्यावर चढणार आहे. अर्पिताच्या लग्नपत्रिकेची छायाचित्रे समोर आली आहेत. क्लासी व्हाइट, गोल्ड आणि पिंक कलरचा वापर या वेडिंग कार्डसाठी करण्यात आला आहे. एका पत्रिकेत सलीम, सलमा आणि हेलन यांच्याकडून पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. व्हाइट बॅकग्राउंडवर गोल्डन रंगाने हे निमंत्रण लिहिण्यात आले आहे. दुस-या कार्डमध्ये अर्पिताचे बहीणभाऊ सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविराने पाहुण्यांना रिसेप्शनचे आमंत्रण दिले आहे. व्हाइट बॅकग्राउंडवर फ्लोरल डिझाइनने सजलेल्या कार्डवर हा संदेश गोल्डन रंगाने लिहिण्यात आला आहे. इतकेच नाही तर या कार्डसोबत पाहुण्यांना मिठाईचा बॉक्स दिला जात आहे.
आता बोलुयात अर्पिताच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांविषयी. सलमानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्पिताच्या लग्नासाठी आमंत्रित केले आहे. मात्र मोदी या लग्नाला हजेरी लावणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याव्यतिरिक्त शाहरुख खान, कतरिना कैफ, आमिर खान-किरण राव, करण जोहर, साजिद नाडियाडवाला, डेविड धवन, त्यांच्या पत्नी आणि मुले रोहित, वरुण धवन, हेमा मालिनी, धर्मेंद्र, चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामजरण तेजा यांची हजेरी निश्चित असणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या वेडिंग कार्डचे काही इनसाइट पिक्स...