आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिताचेच नव्हे, या बॉलिवूड स्टार्सचेही Wedding Cards होते अतिशय आकर्षक, पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, अभिषेक-ऐश्वर्या, विवेक-प्रियांका, राज-शिल्पा आणि अर्पिताचे वेडिंग कार्ड्स)
मुंबईः बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरात सध्या लगीनघाई सुरु आहे. उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी सलमानची बहीण अर्पिता बॉयफ्रेंड आयुषसोबत बोहल्यावर चढणार आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका खान कुटुंबीयांच्या मित्र आणि नातेवाईकांना मिळाल्या आहेत. अर्पिताचा लग्नसोहळा शाही ठरवा, यासाठी खान कुटुंबीयांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. अर्पिताची लग्नपत्रिका खूप आकर्षक बनवण्यात आली आहे. या पत्रिकेत लग्न आणि 21 नोव्हेंबर रोजी होणा-या रिसेप्शन पार्टीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या पत्रिकेसोबत खान कुटुंबीयांनी पाहुण्यांना खजूरचा मिठाईचा बॉक्सदेखील दिला आहे.
अर्पिताच्याच नव्हे तर बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिका खूप आकर्षक होत्या. अभिषेक-ऐश्वर्या, अहाना देओल-वैभव वोरा, शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिका खूप सुंदर आणि आकर्षक होत्या.
अर्पिताच्या लग्नाचे निमित्त साधत आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिकेची खास झलक या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कशी होती अभिषेक-ऐश्वर्या, राज-शिल्पासह या सेलिब्रिटींची लग्नपत्रिका...