आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special : Wedding Photos Of Bollywood Actress Vidya Balan

B'day: सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी आहे विद्या बालन, पाहा Wedding Album

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नाच्या विधीत विद्या बालन)
मुबंईः बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आज 37 वर्षांची झाली. 1 जानेवारी 1978 रोजी जन्मलेली विद्या प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांची तिसरी पत्नी आहे. 14 डिसेंबर 2012 रोजी विद्या आणि सिद्धार्थ लग्नगाठीत अडकले. मुंबईतील वांद्रास्थित ग्रीन गिफ्ट नावाच्या बंगल्यात विद्या आणि सिद्धार्थचा लग्नसोहळा पार पडला. लग्नाचा कार्यक्रम खासगी होता. या लग्नात केवळ कुटुंबीय सहभागी झाले होते.
पंजाबी आणि तामिळ पद्धतीने हे लग्न झाले. विद्या सिद्धार्थ यांची तिसरी पत्नी आहे. पहिली पत्नी ही त्यांची बालपणीची मैत्रीण होती. या दोघांचा एक मुलगासुद्धा आहे. तर दुसरी पत्नी टीव्ही निर्माती होती.
सिद्धार्थ डिस्ने इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते अभ्यासात खूप हुशार होते. मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून सिद्धार्थ यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीएची पदवी प्राप्त केली. सिद्धार्थचे दोन भाऊ आदित्य आणि कुणाल बॉलिवूड अभिनेते आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विद्याच्या लग्नाची खास छायाचित्रे...