आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 44व्या वर्षी ट्रॅजेडी किंग 22 वर्षांच्या सायरासह अडकले होते लग्नगाठीत, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: भारतीय सिनेजगात ट्रॅजडी किंग म्हटले, की प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
एव्हरग्रीन राहणा-या दिलीप कुमारांचा जन्म तसा पाकिस्तानमध्ये झाला. परंतु विभागणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले होते. दिलीप कुमार यांनी 1966मध्ये बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये सामील असलेल्या सायरा बानोसह लग्न केले होते. त्यांचे लग्न झाले तेव्हा सायरा 22 आणि दिलीप 44 वर्षांचे होते.
1966मध्ये अचानक दिलीप आणि सायरा यांच्या लग्नाची बातमी वा-यासारखी सर्वत्र पसरली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. धक्का बसण्याचे कारण ऐवढेच होते, की लग्नापूर्वी सायरा यांचे ना दिलीप कुमार यांच्याशी काही अफेअर होते ना तशी कोणतीही चर्चा बॉलिवूड जगात होती. सुरूवातीला लोकांना ही बातमी खोटी वाटली.
आज ही जोडी प्रसिध्द जोड्यांमधील एक आहे. वेळेनुसार दोघांमधील प्रेम वाढत गेले. आजही दोघे जेव्हा सर्वजनिक ठिकाणी येतात तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर टिकून असतात. असे सांगितले जाते, की दिलीप कुमार यांच्यासह लग्न करण्यापूर्वी सायरा यांचे अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याशी अफेअर होते. मात्र सायरा नंतर दिलीप यांच्यावर फिदा झाल्या आणि आपल्यापेक्षा 22 वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत लग्न केले.
सायरा आणि राजेंद्र कुमार यांचे अफेअर चालू होते तेव्हा ते विवाहबध्द होते. सायरा बानो आणि त्यांचे अफेअर राजेंद्र यांच्या पत्नीला आणि सायर यांची आई नसीमा बानो यांना ठाऊक होते. त्यामुळे दिलीप कुमार यांच्याशी सुरूवातीपासून परिचित असलेल्या नसीमा बानो यांनी सायरा यांच्या लग्नाचा प्रस्ताव दिलीप यांच्या समोर मांडला. दिलीप या प्रस्तावाने आनंदी होते आणि त्यांनी लवकरात-लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सायरासुध्दा दिलीप कुमार यांना बालपणापासून पसंत करत होती. अखेर 11 ऑक्टोबर 1966मध्ये दोघे लग्नगाठीत अडकले. यांच्या लग्नामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स सामील झाले होते. वरातीची तयारी पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. त्यात राज कपूर आणि देवानंदसुध्दा उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाची छायाचित्रे...
नोट: आज मुंबईमध्ये दिलीप कुमार यांच्या ऑटोबायोग्राफी 'दिलीप कुमार: द सब्सटेन्स अँड द शॅडो'चे लोकार्पण होणार आहे.