आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day:वयाच्या 8व्या वर्षी दिलीप साहेबांवर जडला होता सायरा यांचा जीव, पाहा लग्नाचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नाच्या वेळी क्लिक करण्यात आलेले सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचे छायाचित्र)

मुंबई
- गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो वयाच्या आठव्या वर्षीच ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. 1952 मध्ये दिग्दर्शक महबूब खान यांचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे घडले होते. या सिनेमात दिलीप कुमार आणि निम्मी प्रमुख भूमिकेत होते. असे म्हटले जाते, की हा सिनेमा बघून सायरा बानो दिलीप साहेबांच्या प्रेमात पडल्या. तेव्हाच त्यांनी दिलीप साहेबांसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर 11 ऑक्टोबर 1996 त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. या दोघांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी सहभागी झाली होती. दिलीप कुमार सध्या फुफ्फुसाच्या त्रासीने लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. दिलीप साहेब 11 डिसेंबर रोजी 92 वर्षांचे होत आहेत. गेल्या वर्षीसुध्दा याच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली होती.
दिलीप कुमार यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'ज्वार भाटा' (1944)मधून केली. या सिनेमातून ते प्रेक्षकांना आकर्षित करू शकले नाहीत. 1947मध्ये त्यांनी 'जुगनू'मध्ये काम केले. हा सिनेमा यशस्वी ठरला आणि लोकांनी त्यांना पसंत केले. त्यानंतर त्यांनी 'शहीद', 'अंदाज', 'दाग', 'दीदार', 'मधुमती', 'देवदास', 'मुसाफिर', 'नया दौर', 'आन', 'आजाद'सारखे अनेक हिट सिनेमे दिले.

ज्यावेळी दिलीप कुमार यांच्याबरोबर सायरा बानोचे लग्न झाले तेव्हा त्या 22 तर दिलीप साहेब 44 वर्षांचे होते. त्याकाळात सगळेच दिलीप कुमार यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे दिलीप कुमार यांनी वयाच्या 44व्या वर्षी लग्न केले होते. मात्र दिलीप-सायरा यांच्या लग्नाची बातमी सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी होती. त्याचे कारण होते त्यांच्या वयातील 22 वर्षांचे अंतर.

आज ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक असून दिवसेंदिवस या दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होत गेले. आजही हे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन आहेत. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या लग्नाची बातमी सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का देणारी होती. कारण कधीच या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली नव्हती.

असे म्हटले जाते, की दिलीप कुमार यांच्याबरोबर लग्नगाठीत अडकण्यापूर्वी सायरा बानो आणि
राजेंद्र कुमार यांचा रोमान्स सुरु होता. मात्र त्यावेळी राजेंद्र कुमार विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. सायरा-राजेंद्र यांच्या नात्याबद्दल राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि सायरा बानोची आई नसीम बानो यांना समजले होते. त्यामुळे नसीम बानो यांनी त्यांच्या परिचयाचे असलेल्या दिलीप साहेबांसमोर सायरा बानोबरोबर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नसीम बानो यांचा प्रस्ताव दिलीप साहेबांनी स्वीकारला.

सायरा जेव्हा आठ वर्षांच्या होत्या तेव्हापासून आईसारखी यशस्वी अभिनेत्री आणि मिसेस दिलीप कुमार होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे त्यांनी स्वतः आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते. सायरा बानो आणि दिलीप कुमार लग्नानंतर 'गोपी', 'बैराग' आणि 'दुनिया' या सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र झळकले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा दिलीप साहेब आणि सायरा यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...