आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special : Wedding Pictures Of Yukta Mookhey

B'Day: 5 वर्षेसुद्धा टिकले नाही या माजी जगतसुंदरीचे लग्न, पाहा Wedding Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : युक्ता मुखी आणि प्रिन्स तुली)
मुंबईः माजी जगतसुंदरी युक्ता मुखी हिचे लग्न नोव्हेंबर 2008 मध्ये प्रिन्स तुलीसोबत झाले होते. दोघांची भेट नागपूरमध्ये झाली होती. येथे युक्ता मुखी एका फोटोशूटच्या निमित्ताने गेली होती. तुली एका मोठ्या व्यावसायिक घराण्याशी संबंधित आहे. त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय हॉटेल, मॉल्स, कॉलेज आणि उपकरण बनवण्याच्या क्षेत्रात पसरला आहे.
सप्टेंबर 2008 मध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये युक्ता आणि प्रिन्सचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर याचवर्षी नागपूरमधील गुरुद्वारामध्ये शिख पद्धतीने दोघे विवाहबंधनात अडकले होते. मात्र या दोघांचे लग्न पाच वर्षेसुद्धा टिकू शकले नाही. 2013 मध्ये या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. युक्ताने प्रिन्सवर मारहाणीचा आरोप लावला होता. जून 2014मध्ये हे दोघे कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन नेहमीसाठी विभक्त झाले. प्रिन्स तुली आणि युक्ताचा एक मुलगा असून घटस्फोटानंतर त्याची कस्टडी युक्ताला मिळाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा युक्ता मुखी आणि प्रिन्स तुली यांच्या साखरपुडा आणि लग्नाची छायाचित्रे...
नोटः माजी जगतसुंदरी युक्ती मुखी हिचा आज 37 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने divyamarathi.comचा हा रिपोर्ट..