आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टिस्टारर \'वेलकम बॅक\'ने मोकळा केला आमिरच्या \'पीके\'चा मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनीस बज्मी दिग्दर्शित 'वेलकम बॅक' 19 डिसेंबर रोजी रिलीज होणार असल्याची माहिती होती. मात्र आता असे होणार नाहिये. निर्माता फिरोज नाडियाडवाला सिनेमाला ख्रिसमसच्या आठवड्यात प्रदर्शित करण्याच्या विचारात आहे. मात्र राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'पीके' 19 डिसेंबरला प्रदर्शित होत असल्याने तो मागे सरकला आहे.
अनीसने याचे स्पष्टिकरण देताना सांगितले, 'फिरोजला डिसेंबरची तारिख सोडण्याची इच्छा नाहीये. मात्र मला बॉक्स ऑफिसवर या स्पर्धेचे काहीच कारण दिसत नाहीये. मी त्याला समजावेल, की आपण रिलीजसाठी दुसरी तारिख शोधू.'
असे नाही, की अनीसला आपल्या सिनेमावर विश्वास नाहीये. त्याने सांगितले, 'माझे एक
निश्चित वर्गातील प्रेक्षक आहेत. त्यामुळे मी नको त्या स्पर्धेत का पडू? त्यामुळे कोणत्याही एका सिनेमाचे नुकसान होऊ शकते. त्यापेक्षा इतर शुक्रवारची प्रतिक्षा केली तर काय वाईट आहे.'
राजू हिराणी उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यातच ते आपल्या '3 इडियट्स'चा स्टार अमिर खानसह येत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर धूम होणार हे निश्चित आहे. त्यामुळे इतर सिनेमांचे काही प्रमाणात नुकसान होणार हे नक्की.
ते सध्या सिनेमासाठी एक एक्स्ट्रा गाणे तयार करत आहेत. त्याची शुटिंग ते अनिल कपूर, जॉन अब्राहम, नसीरुद्दीन शाह आणि नाना पाटेकर यांच्यासह फावल्या वेळेत करणार आहेत.