आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'किक' आणि 'क्रिश'पूर्वी बिग बीसुध्दा दिसले आहेत मास्क अवतारात, जाणून घ्या अशाच स्टार्सविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स: अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि सलमान खान
मुंबई: सलमान खान अभिनीत 'किक' नुकताच रिलीज झाला, त्यामध्ये त्याने 'डेव्हिल'च्या भूमिकेत अनेक ठिकाणी मास्क घातलेला अवतारात दिसला. सलमानच्या या अंदाजाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली. बॉलिवूडमध्ये मास्क परिधान करून भूमिका साकारणारे कमीच अभिनेते दिसतात. यापूर्वी 'अजूबा'मध्ये अमिताभ बच्चन आणि 'क्रिश'मध्ये हृतिक रोशनसुध्दा चेह-यावर मास्क घातलेले दिसले.
हॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनेता-अभिनेत्री अनेकदा मास्क घालून रुपेरी पडद्यावर झळकतात. परंतु हिंदी सिनेमांत हा प्रयोग खूप कमीवेळा पाहायला मिळतो. हॉलिवूडकडे एक नजर वळून बघितले तर, 'स्पायडर मॅन', 'बॅट मॅन', 'द मास्क' आणि 'मास्क ऑफ जोरो'सारख्या अनेक सिनेमांमध्ये नायकांच्या चेह-यावर मास्क दिसून आले आहेत.
'किक'मधील सलमानपूर्वी 'क्रिश 3'मध्ये हृतिक रोशन सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला होता. क्रिशमध्ये हृतिकसुध्दा अनेक ठिकाणी मास्क घातलेला दिसतो. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे रोवले होते. तसेच, मुलांमध्ये क्रिशच्या मास्कची बरीच क्रेझ पाहायला मिळाली होती. या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच नायकांविषयी सांगणार आहोत, जे मास्क घालून रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.
कोण-कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री मास्क घालून रुपेरी पडद्यावर झळकल्या आहेत, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...