आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नशेत टल्ली होऊन सेलेब्स कसे होतात \'OUT OF CONTROL\' बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स: सलमान खान आणि अमिषा पटेल
मुंबई: बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्स नशेत टल्ली होऊन गोंधळ घालण्याच्या गोष्टी काही नवीन नाहीत. टीव्हीवर प्रसारित होणारी 'दीया और बाती हम' या लोकप्रिय मालिकेची मुख्य नायिका संध्या अर्थातच दीपिका सिंह रविवारी (22 जून) रोजी मुंबईमध्ये आयोजित 'स्टार परिवार अवॉर्ड्स'दरम्यान नशेत आली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दीपिका सिंहने या आरोपांना अफवा असल्याचे सांगून नाकारले आहे. तिने सांगितले, की चार दिवस एकसारखे सिनेमाचे शुटिंग केल्याने ती थकल्यासारखी दिसत होती. अनेक महिन्यांपासून तिने मद्यपान करणे सोडले आहे. तरीदेखील तिच्यावर असे मुर्खासारखे आरोप लावण्यात येत आहेत.
असो, हे काही पहिले असे प्रकरण नाहीये यापूर्वीसुध्दा अनेक स्टार्स नशेत टल्ली होऊन सर्वजनिक ठिकाणी गेलेले आहेत. अलीकडेच, अभिनेता बॉबी देओलला एका गार्डने दारूची मागणी केल्यावरून कानशिलात लगावली होती. एवढेच नाही तर, जानेवारी 2012मध्ये संजय दत्तव्दारा आयोजित एका पार्टीत शाहरुख खाननेसुध्दा स्वत:वरील ताबा गमावला आणि भर पार्टीत त्याने फराह खानचा पती शिरीष कुंदरला थप्पड मारली होती. त्यामुळे फराह आणि शाहरुखच्या नात्यात कटूता निर्माण झाली होती.
सलमान खान नशेत टल्ली होऊन एक्स गर्लफ्रेंड आणि लोकांना मारहाण करण्याच्या प्रकरणात खूप बदनाम झालेला आहे. एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चनवर हात उचलण्याच्या प्रकरणात तो सतत चर्चेत राहिला होता. एवढेच नाही तर, सलमानने नशेत केलेल्या घटनांचे परिणाम 'हिट अँड रन' प्रकरणाच्या माध्यमातून अजूनही भोगत आहे. कोर्टात या प्रकरणाची सुवानणी अजूनही चालू आहे. अशा प्रकरणात अडकलेल्या बॉलिवूडच्या स्टार्सची मोठी यादी आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही स्टार्सची अशी छायाचित्रे. दाखवणार आहोत जे मद्यपान करताना कॅमे-यात कैद झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांच्या माध्यमांतून पाहा नशेत टल्ली बॉलिवूड स्टार्स कसे पार्ट्यांमध्ये गमावतात स्वत:वरील ताबा... या छायाचित्रांमध्ये टीव्ही स्टार्सपासून ते सिनेमा स्टार्सपर्यंत अनेक चेहरे सामील आहेत...