आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Doctors Told Hrithik Roshan If You Fly, You Die!

डॉक्टरांनी हृतिकला म्हटले होते, 'आता फ्लाइटमध्ये गेला तर जीवाला मुकावे लागेल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन)

'बँग बँग' या आगामी सिनेमातील शूटिंगदरम्यान हृतिकला ब्रेन इंज्युरी झाली होती. त्यामुळे तो दीड महिना पलंगाला खिळून राहिला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी नेमके काय घडले होते, हे हृतिकने आता माध्यमांना सांगितले.
हृतिक म्हणाला, "त्यावेळी मी ट्रेडमिलवर व्यायाम करत होतो. पुढील आठ तासांत मला फ्लाइट पकडायची आहे, हा विचार मनात घोळत होता. मात्र त्याचवेळी माझ्यासोबत काहीतरी वेगळे घडत असल्याचे माझ्या लक्षात आले. हातापायांचा शरीरासोबत संबंध वाटत नव्हता. माझे हस्ताक्षर बदलले होते. मी लिहू शकत नव्हतो. मी तात्काळ डॉक्टरांना फोन केला आणि स्कॅन करुन घेतले. माझ्या डोक्यातील एका बाजुला रक्त जमा झाले होते. मेंदू उजवीकडे सरकला होता. पुढील आठ तासांत मला फ्लाइट पकडायची आहे, असे मी डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, आता जर तू उडालास तर जीवाला मुकावे लागेल. मेंदूतून रक्त बाहेर येऊ दे."
हृतिकने पुढील तीन तास रिसर्च करुन दोन ते तीन डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र त्यापैकी एका डॉक्टरवर त्याचा विश्वास बसला. त्यांनी हृतिकला म्हटले, "मी एक डॉक्टर आहे आणि तू पेशंट आहे. मला काय करायचे आहे, हे मला ठाऊक आहे."
हृतिकने सांगितले, ''ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर नर्ससोबत गाणे गुणगुणत होते, ते स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जेव्हा डोक्यातून रक्ताचा फवारा निघू लागला, तेव्हा गाणे बंद झाले.''