आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • When Ex Lovers Salman Khan, Aishwarya Rai, Sangeeta Bijlani Met At Zayed Khan’S Wedding Reception

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: 9 वर्षांपूर्वी जाएदच्या लग्नात जमली होती सेलेब्सची मांदियाळी, सल्लूसोबत दिसली होती ऐश्वर्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संगीता बिजलानी, सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन)

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता जाएद खानच्या वेडिंग रिसेप्शनची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे नऊ वर्षांपूर्वीची असून यामध्ये तुम्हाला तुमच्या फेव्हरेट स्टार्सची त्याकाळची झलक बघायला मिळणार आहे. नोव्हेंबर 2005 मध्ये जाएदचे लग्न त्याची बालमैत्रिण मलायका पारेखबरोबर झाले होते. वयाच्या 25व्या वर्षी जाएद मलायकाबरोबर लग्नगाठीत अडकला. या दोघांचे लग्न बॉलिवूडमधील मोठ्या इव्हेंटपैकी एक होते. या दोघांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी या पार्टीत जमली होती.
या रिसेप्शन पार्टीत एक हटके कॉम्बिनेशन बघायला मिळाले होते. ते म्हणजे सलमान खान, ऐश्वर्या राय आणि संगीता बिजलानी हे तिघे चक्क एका ठिकाणी जमले होते. या पार्टीत ऐश्वर्या तिची आई वृंदा रायबरोबर पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या ब्लॅक साडीत दिसली होती. तर संगीता बिजलानी कलरफूल साडीत आणि सलमान खान ब्लू शर्ट-डेनिममध्ये दिसला होता.
ही सर्व छायाचित्रे नऊ वर्षे जुनी असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. या पॅकेजमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या स्टार्सचे त्यावेळेचे रुप बघू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सेलिब्रिटींचे नऊ वर्षांपुर्वीचे आणि आत्ताचे रुप...