आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Harman Baweja Met Gangster Maya Dolas In His Childhood

बालपणी जेव्हा ख-या गँगस्टरला भेटला हरमन, जाणून घ्या काय घडले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2008मध्ये प्रदर्शित झालेला 'लव्ह स्टोरी 2050' सिनेमामधून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात करणारा अभिनेता हरमन बावेजा दिर्घकाळानंतर 'ढिश्क्यांऊ' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या सिनेमापूर्वी 2009मध्ये आलेला 'व्हॉट्स योअर राशी'मध्ये त्याने काम केले होते. 'ढिश्क्यांऊ'मध्ये तो एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे.
अलीकडेच सिनेमाच्या प्रमोशन संदर्भात हरमन, अभिनेत्री आएशा खन्ना आणि सिनेमाची निर्माती शिल्पा शेट्टीसोबत मुंबईच्या दिव्य मराठी डॉट कॉम ऑफिसमध्ये पोहोचला होता. येथे हरमनने सिनेमाविषयी आणि आपल्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी शेअर केल्या.
दिव्य मराठी डॉट कॉमसोबत बातचीत करताना हरमनने त्याचे काही अनुभव शेअर केले. त्याने सांगितले, की त्याचा सर्वात रंजक अनुभव बालपणी रिअल लाइफ गँगस्टर माया डोळसला भेटण्याचा होता.
हरमन पुढे म्हणतो, 'मी लहान असताना कुटुंबीयांसोबत मुंबईच्या अंधेरी लोखंडवाला परिसरात राहत होतो. मी आताही तिथेच राहतो. मी बालपणी त्या परिसरातील प्रसिध्द आइसक्रिम पार्लरमध्ये वडीलांसोबत नेहमी जात असे. एकदा मी तिथे लांब वाढलेले केसांच्या एका व्यक्तीला पाहिले. त्यानंतर काही दिवसांनी मी त्याच व्यक्तीचा फोटो वर्तमानपत्रात बघितला. तेव्हा मला माहित झाले, की तो एक मोठा गँगस्टर आहे. त्याचे माया डोळस होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा हरमनने कशाप्रकारे आएशाची उडवली खिल्ली?