प्रियांका चोप्राला बॉलिवूडमधील सर्वास सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिचे टि्वटर अकाउंटवर 6.36 कोटी तर
फेसबुक अकाउंटवर 1.49 कोटी फॉलोअर्स आहेत. मात्र जेव्हा तिने आपल्या चाहत्यांशी रेडिटच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला बराच वाईट अनुभव आला.
झाले असे, की अभिनेत्री, निर्माती आणि गायिका प्रियांका चोप्रा आपल्या चाहत्यांना रेडिटवर बोलताना तिला एकाने खूपच वाईट प्रश्न विचारला.
एका चाहत्यांने तिला हॉलिवूड रॅपर पिटबुलसह शैय्यासोबत केली आहे का? असा प्रश्न विचारताच प्रियांकाने लज्जित होऊन मान खाली घातली. प्रियांकाला यावेळी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. या प्रश्नानंतर मुंबईच्या एका रोडला तिच्या वडिलांचे नाव देण्यामागे काय कारण आहे आणि यात भ्रष्टाचाराचा संशय येत असल्याचेही चाहते म्हणाले.
अभिनेत्री बनण्यापूर्वी तू एक ब्यूटी क्वीन होतीस. काय वाटते ब्यूटी कॉम्पिटीशनचा समाजावर वाईट परिणाम होतो? त्या लेखाविषयी तुझे काय म्हणणे आहे, ज्यामध्ये तुझ्या वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता? हे प्रश्न ऐकून असे वाटते, की प्रियांकाला चाहत्यांशी रेडिटवरील साधलेला संपर्क महागात पडला आहे.