आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Sanjay Manyata Celebrate Wedding Anniversary On The Sets Of PK

जेव्हा 'PK'च्या सेटवर संजय दत्तने साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके'च्या सेटवर पत्नी मान्यतासोबत संजय दत्त)
मुंबईः आगामी 'पीके' या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील काही छायाचित्रे अलीकडेच समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता आणि मुले इकरा-शाहरानसोबत सिनेमाच्या सेटवर दिसतोय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'यावर्षी 7 फेब्रुवारीला संजय दत्त आणि मान्यताच्या लग्नाचा सहावा वाढदिवस होता. यादिवशी संजय 'पीके' सिनेमातील एका महत्त्वाच्या गाण्याच्या शूटिंगमध्ये बिझी होता. यावेळी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी संजयचा लग्नाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी बँड मेंबर्सना एक खास गाणे वाजवायला सांगितले. यावेळी मान्यताने दोन्ही मुलांसोबत शूटिंग सेटवर हजेरी लावून संजयला सरप्राईज दिले. सेटवर उपस्थितांनी सांगितल्याप्रमाणे, शाहरान आणि इकरा आपल्या वडिलांचा नवीन लूक बघून आश्चर्यचकित झाले होते.' पीके या सिनेमात संजय दत्तने बँड मास्टर भैरोसिंहची भूमिका साकारली आहे.
संजय दत्तने मागितली 14 दिवसांची रजा...
अलीकडेच बातमी आली होती, की येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजयने तुरुंग प्रशासनाकडे 14 दिवसांची रजा मिळावी, यासाठी अर्ज दिला आहे. 'पीके' सिनेमाच्या प्रमोशनसाठी संजयने रजा मागितली असल्याचे म्हटले जात आहे. संजय दत्त 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीके'च्या शूटिंग सेटवरील अलीकडेच समोर आलेली संजय दत्तची त्याच्या कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...
नोटः राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'पीके' या सिनेमात संजय दत्तसोबत आमिर खान, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहेत. येत्या 19 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.