आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लिमट्रीम सोनमचे एकेकाळी वजन होते 87 किलो, दिसायची काहीशी अशी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बॉलिवूडमधील स्लिम अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनम एवढी बारीक नव्हती. आपल्या वाढलेल्या वजनामुळे ती काळजीत पडली होती.
2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या सोनमने आपले 32 किलो वजन कमी करावे लागले होते. सिंगापूरमध्ये अभिनयाचे धडे गिरवून भारतात परतलेल्या सोनमचे वजन तब्बल 87 किलो होते.
वजन कमी केल्यानंतर सोनममध्ये एवढा फरक पडला आहे, की पूर्वीची तिची छायाचित्रे पाहून ही सोनमच आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. सोनम केवळ बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रीच नाहीये, तर उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी तिचे कौतुकसुद्धा होते.
जाणून घ्या सोनमच्या डाएट आणि फिटनेस शेड्युलविषयी...
सोनमचे डाएट
>> नाश्ता - एका अंड्याचे ऑम्लेट, एक टोस्ट, एक फळ आणि एक ग्लास कोमट पाणी
>> वर्कआउटनंतर - ज्युससोबत प्रोटीन शेक
>> लंच - चिकन, पोळी, भात, दही आणि फळ. रेड मीटकडे ती दुर्लक्ष करते.
>> डिनर - रात्री लवकरात लवकर जेवण करण्यावर तिचा भर असतो. झोपण्याच्या तीन तासांपूर्वी सोनम जेवण घेते. जेवणात ग्रिल्ड फिश, चिकन, सँडविच, सलाद आणि एक ग्लास प्रोटीनयुक्त शेक घेते.
फिट राहण्यासाठी वर्कआउट
>> रोज 30 मिनेट कार्डिओ
>> प्रत्येकदिवशी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर फोकसे करते. उदा. सोमवारी पोटाचा व्यायाम, मंगळवारी खांद्याचा व्यायाम करते.
>> आठवड्यातून दोनदा डान्स क्लासला जाते. पावर योगा आणि स्क्वॅश खेळते.
>> उन्हाळ्यात स्विमिंग क रते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनमची काही जुनी छायाचित्रे...