आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: जेव्हा '... लीला'साठी सनी लिओनीने केली 100 लिटर दुधाने अंघोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिची अपकमिंग फिल्म 'एक पहेली लीला'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चार दिवसांमध्ये 36 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. दुसरीकडे बातमी आहे, की चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सनीला 100 लिटर दुधाने अंघोळ घालण्यात आली होती.
झाले असे, की राजस्थानमध्ये चित्रपटाचे शुटींग सुरु असताना एका दृश्यात सनीला दुधाने अंघोळ करताना दाखवायचे होते. हे दृष्य चित्रीत करण्यासाठी तब्बल 100 लिटर दुध मागवण्यात आले होते. सनीला थंडी वाजू नये म्हणून त्यात गरम पाणी टाकण्यात आले. या दुधाने अंघोळ केल्याने तिच्या गोर्‍या कायेवर त्याचा थोडा विपरीत परिणाम जाणवला होता. तिच्या शरीरावर रॅशेस दिसू लागले. मात्र तिने त्याचा विचार न करता चित्रीकरण पूर्ण केले.
बॉबी खान दिग्दर्शीत या चित्रपटात सनीसह जय भानुशाली, रजनीश दुग्गल, मोहित अहलावत, मानस रंजन नायक आणि राहुल देव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, '...लीला'च्या शुटींगदरम्यानची सनीची काही खास छायाचित्रे...