आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Where Is Salman Khan\'s Ex Girlfriend Somi Ali These Days

ऐश्वर्यासाठी सलमानने जिला सोडले, आता ती आहे तरी कुठे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले. अशीच अज्ञातवासात निघून गेलेली एक अभिनेत्री म्हणजे सोमी अली. सोमी आज आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे.
25 मार्च 1976 रोजी पाकिस्तानातील कराची येथे सोमीचा जन्म झाला. सोमी 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. अंत, कृष्ण अवतार, यार गद्दार, तीसरा कौन?, आओ प्यार करें, आंदोलन, माफिया, चुप, अग्नि चक्र हे तिचे निवडक सिनेमे आहेत. सोमीची आणखी एक ओळख म्हणजे ती अभिनेता सलमान खानची माजी गर्लफ्रेंड आहे. सोमीचे बॉलिवूड करिअर काही विशेष राहिले नाही. मात्र तिची चर्चा झाली ती सलमान खानबरोबरच्या अफेअरमुळे.
एकेकाळी सिनेमांपेक्षा सोमी सलमानबरोबरच्या अफेअरमुळे लाईमलाईटमध्ये होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यानंतर अज्ञातवासात निघून गेली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आता कुठे आणि काय करतेय सोमी...