आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक कुमार यांच्या नातीने उघडले सलमानचे रहस्य, 'fugly'मधून करतेय पदार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 13 जून 2014 रोजी बॉक्स ऑफिसवर 'फग्ली' सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाची सर्वात रंजक गोष्ट त्याचे स्टार्स आहेत. या सिनेमामधून बॉक्सर विजेंद्रर सिंह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच, किआरा अडवाणीसुध्दा फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करत आहे. विजेंदर सिंह देशातच नव्हे तर जगात लोकप्रिय आहे. त्यामुळे सर्व लोक त्याला ओळखतात. किआराला ओळखणारे विजेंदरच्या तुलनेत खूप कमी आहेत. म्हणून तिच्याविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत...
अशोक कुमार यांची नात आहे किआरा
सिनेमा अभिनेता किशोर कुमार यांना सर्वच ओळखतात. त्यामुळे किआराची ओळख लवकरच तुम्हाला होऊ शकते. कारण ती अशोक कुमार आणि किशोर कुमार यांची नात आहे. किआराचा जन्म 8 मार्च 1992मध्ये मुंबई येथे झाला. तिचे वडील सिंधी आणि आई ब्रिटीश आणि मुस्लिम वंशाची आहे. 2009मध्ये '3 इडियट्स' बघितल्यानंतर तिला इंडस्ट्रीमध्ये येण्याची इच्छा झाली. किआरा अशोक कुमार यांची नात असून सईद जाफरी यांची भाची आहे.
करिअरची सुरूवात
किआरा 'फग्ली'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात करत आहे. परंतु अभिनय शिकण्यासाठी तिने अनुपम खेर यांच्या अभिनय क्लासमध्ये प्रवेश घेतला. ती जुही चावलाचीसुध्दा भाची आहे. याव्यतिरिक्त सलमान खानसुध्दा तिच्या कुटुंबाच्या खूप जवळचा आहे. बातम्यांनुसार, सलमानने तिला इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी मदत केली आहे.
सलमानचे रहस्य केले उघड
किआराने सलमानसंबंधित रहस्यांविषयी सांगितले, सलमान खूप वर्षांपूर्वी मॉडेल शाहीन जाफरीला डेट करत होता. कदाचित त्याचे हे सर्वात पहिले रिलेशनशिप असावे. शाहीन किआराची मावशी आहे. किआरा पुढे सांगते, 'माझी आईची सलमानशी पूर्वीपासून ओळख आहे. कारण तो बांद्रामध्ये मोठा झाला आहे. तो माझी आई जेनिव अडवाणीला म्हणायचा, एक दिवस मी खूप मोठा स्टार होणार आहे. दोघांची दिर्घकाळ मैत्री होती. माझ्या आईने सलमानची शाहीन मावशीसोबत ओळख करून दिली. त्यानंतर दोघे एकमेकांना सतत भेटत होते. सलमान अनेकदा घरी लंचसाठीसुध्दा यायचा.'
किआराने असेही सांगितले, की सलमान जेव्हा 'फग्ली'च्या सेटवर गाणे चित्रीत करत होता तेव्हा माझ्या आईची भेट त्याच्याशी झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किआरा अडवाणीची निवडक छायाचित्रे...