आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Is Protesting Free Alotment Of Land To Madhuri Dixit

माधुरीला डान्स अकादमीसाठी मोफत भूखंड द्यायला होतोय विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या डान्सच्या जोरावर सा-यांनाच थिरकायाला भाग पाडलं. माधुरी आणि डान्स याचं नातं फार जवळचं आहे. त्यामुळे माधुरीला आता नृत्यासाठी काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली आहे. माधुरी दीक्षितला मुंबईत डान्स अकादमी स्थापन करायची आहे. त्यासाठी माधुरीने मुंबई महानगर पालिकेकडे भूखंडाची मागणी केली आहे. माधुरीने पालिका प्रशासनाला पत्र लिहून मुंबईत पश्‍चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर दरम्यान २ हजार स्क्वेअरफुटांचा प्लॉट देण्याची मागणी केली आहे.
मात्र आता माधुरीसमोर एक अडचण निर्माण झाली आहे. माधुरीला मोफत जमीन देण्यास विरोध दर्शवला जात आहे आणि हा विरोध दर्शवणा-या व्यक्तीचे नाव आहे भैरवी गोस्वामी. भैरवी एक अभिनेत्री असून ग्लॅडरॅग्स सुपर मॉडेलही आहे. 'भेजा फ्राय' या चित्रपटात ती झळकली आहे.
भैरवीच्या मते, जी व्यक्ती सहज जमीन खरेदी करु शकते, अशा व्यक्तीला मोफत जमीन देण्याची गरज ती काय ? माधुरीला जर पालिका मोफत जमीन देऊ शकते तर मग मॉडेल्सना ग्रुमिंग अकादमी सुरु करायला का देऊ शकत नाही, असा प्रश्न भैरवीने उपस्थित केला आहे.
भैरवीने पुढे म्हटले की, माधुरी एक लिविंग लिजेंड आहे. तिचा मी खूप आदर करते. पण माझ्या मते, माधुरीने आपल्या देशासाठी असे कुठलेही मोठे काम केलेले नाही, ज्यासाठी तिला भूखंड मोफत द्यायला हवा.
काही दिवसांपूर्वी माधुरीने महाराष्ट्र पर्यटनासाठी मोफत काम करायला नकार दिला होता. याउलट अमिताभ बच्चन यांनी गुजरात टुरिझम आणि आमिर खानने अतिथि देवा भवः या कॅम्पेनसाठी कोणतेही मानधन न घेता काम केले होते. तर माधुरीने मात्र महाराष्ट्र पर्यटनाचे कॅम्पने करण्यासाठी भलीमोठी रक्कम मागितली होती.
आता मुंबई महानगपालिका भैरवीने केलेल्या विरोधाला पाठिंबा देणार की माधुरीला मोफत भूखंड उपलब्ध करुन देणार हे लवकरच स्पष्ट होईल.
माधुरी दीक्षितच्या नख-यांमुळे नाराज झाले महाराष्ट्रातले नेते
माधुरी दीक्षितला अभिनय क्षेत्रातील प्लॅटिनम दिवा पुरस्कार
ता-याला माधुरी दीक्षितचे नाव!