आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Is Your Savithri\' Ram Gopal Varma\'s Contest For His Film

वादग्रस्त पोस्टर नंतर रामगोपालने सुरु केले कॉन्टेस्ट \'कोण आहे तुमची सावित्री?\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - रामगोपाल वर्माचा आगामी चित्रपट 'सावित्री' वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये 13 वर्षांचा मुलगा अक्षेपार्ह्य दृष्यांमध्ये दाखवण्यात आला आहे. आता दिग्दर्शक रामगोपाल वर्माने वादग्रस्त कॉन्टेस्टच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बाल हक्क संरक्षण आयोगाने या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजनंतर नोटीस पाठवली असताना रामूने या कॉन्टेस्टची घोषणा केली आहे. त्याने या स्पर्धेला 'कोण आहे तुमची सावित्री?' असे नाव दिले असून, लोकांना त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा ते ज्या स्त्रीकडे आकर्षित झाले त्या 'सावित्री'बाबतचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

रामूने सांगितले, त्याच्या 'सावित्री'बद्दल
या स्पर्धेची माहिती देणार्‍या प्रेस नोटमध्ये रामगोपाल वर्माने त्याच्या 'सावित्री'बद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, मी शाळेत शिकत असताना आमच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षीका सरस्वती यांच्याबद्दल मला विशेष आकर्षण होते. तीच माझी पहिली 'सावित्री' होती. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक महिला असते, त्यातूनच मला या चित्रपटाची कल्पना सुचली.
महिला संघटनांचा आक्षेप
सावित्रीचे पोस्टर लॉन्च झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेत अनेक महिला संघटना राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. गुंटूर मध्ये महिला संघटनांनी वर्मा यांच्या विरोधात आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्त्या देवी म्हणाल्या, रामगोपाल वर्मा यांना क्रश, आकर्षण आणि वासना यातील भेदच कळालेला दिसत नाही. त्यांनी वर्मा यांना इशारा देताना म्हटले आहे, की जर त्यांनी ही अश्लील जाहीरात बंद केली नाही, तर सामाजिक संघटना आणि कायदा त्यांना योग्य तो धडा नक्की शिकवेल.
सेन्सॉर बोर्डाच्या सदस्याने केला विरोध
चित्रपटामध्ये अल्पवयीन मुलाच्या भूमिकेवरुन प्रादेशिक सेन्सॉर बोर्डाचे सदस्य मंगा रेड्डी यांनी म्हटले आहे, की रामगोपल वर्मा यांनी चित्रपटात 18 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तीला घेतले असते तर कोणालाही आक्षेप नव्हता. मात्र, त्यांना जर वाटत असेल, की एखाद्या मुलाच्या मनात अशा भावना उत्पन्न होतात तर, त्यांना मानसीक उपचारांची गरज आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चित्रपटाचे पोस्टर