आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दीपिकऐवजी करीनाला घेतले असते तर कुणीच 'कॉकटेल' बघितला नसता'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्न हा हॉट टॉपिक आहे. हे दोघे लग्न कधी करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे. अशात सैफ आणि करीनाला एकत्र वेळ घालवायला आवडत असणार असा विचार त्यांचे चाहते करतात. तर मग सैफने आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'कॉकटेल' या सिनेमात करीनाला न घेता दीपिकाला का घेतले असा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडला आहे. सैफने आपल्या चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. एका कार्यक्रमाला हजेरी लावणा-या सैफने हे सस्पेन्स उघड केले.
सैफने सांगितले की. 'लोकांना मोठ्या पडद्यावर करीनाची आणि माझी जोडी आवडत नाही. त्यामुळे आम्हीच ठरवलंय की एकमेकांबरोबर काम करायचं नाही, त्यापेक्षा इतर स्टार्सबरोबरच भरपूर काम करायचं.'
करीना आणि सैफच्या रिलेशनशीपची चर्चा नेहमी होत असते. पण त्यांची जोडी पडद्यावर मात्र तितकीशी क्लिक झाली नाही. याबद्दल सैफ सांगतो की, लोकांना आम्ही एकत्र काम केलेलं आवडतं नाही असं दिसतंय. मग आम्हीही असा निर्णय घेतला की, इतर स्टार्सबरोबर काम करायचं. आम्हाला खूप काम करायचंय आणि त्यात आम्ही खूश आहोत. या सिनेमात दीपिकाबरोबर काम करणं हा मस्त अनुभव होता'.
फ्रेंडशीपचं हळुवार नातं दाखवणारा, सैफ अली खान, दीपिका पडुकोण आणि डायना पेंटी यांचा ' कॉकटेल ' हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. तिघांच्या मैत्रीवरच बेतलेला सैफचा ' दिल चाहता है' हा सिनेमा खूप गाजला होता. त्यामुळे सैफला या नव्या सिनेमाकडूनही खूप अपेक्षा आहेत. हा सिनेमा म्हणजे मैत्री, प्रवास, भावना अशा अनेक गोष्टींचं छान 'कॉकटेल' असल्याचे सैफने सांगितले.
'झलक...'चे शुटिंग मध्येच थांबवून निघून गेला सैफ
शाही थाटाला कंटाळलाय सैफ
सैफ अलीसोबत दीपिकाचे इंटीमेट सीन्स! पाहा व्हिडिओ