अभिनेता अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर रामपाल
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर रामपाल यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्री (7 ऑगस्ट) अर्जुन पत्नी मेहरसह दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या बर्थडे पार्टीत सामील झाला होता. या पार्टीत हृतिक रोशनची पत्नी सुझान रोशनसुध्दा तिथे पोहोचली होती. त्यावेळी मेहर अचानक पार्टीतून बाहेर पडली. ती बाहेर पडल्यानंतर तिच्या डोळ्यांत अश्रु दिसून आले.
पार्टीतील एका जवळच्या सूत्राने सांगितले, 'अर्जुन आणि मेहर रात्री जवळपास 12:15 वाजता पार्टीत सामील झाले होते. रात्री 2:30 वाजता मेहर पार्टीमधून बाहेर आली. ती खूप तणावाखाली दिसून आली आणि तिच्या डोळ्यांत पाणीही दिसले. मेहरने जेव्हा फोटोग्राफर्सना पाहिले तेव्हा एका हाताने तिने चेहरा झाकून घेतला. त्यानंतर ती कुणाला तरी फोनवर बोलत असताना ड्रायव्हरला गाडी घेऊन बोलावले आणि पार्टीतून निघून गेली.'
सूत्रांनी पुढे सांगितल, 'त्यानंतर जवळपास एक तांसानी सुझानसुध्दा पार्टीमधून निघून गेली. त्याच्या 15 मिनीटांनी अर्जुननेही पार्टी सोडली. तो गाडीत बसताना चेहरा लपवत होता.' 'बी-टाऊनच्या वर्तुळात अर्जुन-सुझान यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र, सुझानला नेहमीच अर्जुनची फॅमिली फ्रेंड सांगण्यात आले आहे.'
या पार्टीमधून बाहेर पडलेल्या मेहर-अर्जुनची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...