(अभिनेत्री चित्रांगदा सिंह आणि सोहा अली खान)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह आणि सोहा अली खान गुरुवारी (25 सप्टेंबर) एका हेअर रिमूव्हल प्रॉडक्टच्या लाँचिंगमध्ये पोहोचल्या होत्या. हा इव्हेंट मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. हे हेअर रिमूव्हल प्रॉडक्ट महिलांसाठी आहे.
इव्हेंटमध्ये चित्रांगदा पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. तसेच, सोहा अली खान शॉर्ट ड्रेस लूकमध्ये दिसली. तिने शॉर्ट ब्लू जॅकेट परिधान केलेले होते. या दोन्ही अभिनेत्रींनी यावेळी हातावरील व्हॅक्सिंग केले. चित्रांगदा या व्हॅक्सिंग प्रॉडक्टशी गेल्या दोन वर्षांपासून जोडलेली आहे. तिने इव्हेंटमध्ये सांगितले, 'या कंपनीसोबत माझे हे दुसरे वर्षे आहे. मी स्वत: या प्रॉडक्टचा वापर करते.'
दुसरीकडे, सोहाने सांगितले, 'जेव्हा मी इंग्लंडमध्ये होते. तेव्हा मी पहिल्यांदा व्हॅक्सिंग केली होती. तिथे मी एक विद्यार्थी म्हणून 4-5 वर्षे राहिले आहे. स्टूडेंट लाइफ ब्यूटी पार्लरमध्ये जाणे महागात पडत होते. त्यावेळी रेंजचा वापर करत होते. माझ्या अनेक मैत्रीणी या प्रॉडक्टचा वापर करतात.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या चित्रांगदा आणि सोहाची छायाचित्रे...