FHM मॅगझिनसाठी यामी गौतमचे फोटोशूट
मुंबई - फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतमने अलीकडेच FHM मॅगझिनच्या जून महिन्याच्या अंकासाठी एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ही पंजाबी गर्ल खूप ग्लॅमरस दिसत आहे. यामीचे नवीन रुप या फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. यामीने पहिल्यांदाच कॅमे-यासमोर स्वतःला एवढे एक्सपोज केले आहे. मॅगझिनसाठी करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये यामी शॉर्ट टॉप्स आणि रिव्हिलिंग टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून यामीने बहनजी टाइप म्हणून निंदा करणा-या लोकांचे तोंड बंद केले आहे.
खरं तर या फोटोशूटसाठी यामीने बिकिनी परिधान करावी, असे FHM मॅगझिनच्या प्रमुखांचे मत होते, मात्र यामीने यासाठी नकार दिला. ऑन स्क्रिन असो किंवा ऑफ स्क्रिन बिकिनी परिधान करणार नाही, असे यामीने यापूर्वीही स्पष्ट केले आहे. तिने अलीकडेच वरुण धवनसोबत श्रीराम राघवन यांचा आगामी बदलापूर हा सिनेमा साइन केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा FHM मॅगझिनसाठी यामी गौतमने केलेल्या फोटोशूटची निवडक 6 छायाचित्रे...