आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोमान्सचे बादशाह होते यश चोप्रा, बघा त्यांच्या सिनेमातील निवडक Romantic सीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यश चोप्रा यांच्या गाजलेल्या सिनेमातील दृश्ये..)

लाहोर येथे 27 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेले यश चोप्रा खिशात केवळ 200 रुपये घेऊन मुंबईत दाखल झाले होते. दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या या तरुणाने नंतर बॉलिवूडमधील सर्वात बडे प्रॉडक्शन हाऊस अशी ख्याती यशराज फिल्म्सला मिळवून दिली. दरवर्षी किमान तीन सिनेमांची निर्मिती करण्याचा यशराज फिल्म्सचा प्रघात आहे.
मोठे बंधू बी आर चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक बनण्यापूर्वी आय एस जोहर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 1959 साली झळकलेल्या ‘धूल का फूल’ या सिनेमाद्वारे स्वतंत्रपणे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.
यश चोप्रा रोमँटिक सिनेमांसाठी ओळखले जातात. ते आज आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या मनात राहणार आहेत.