आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yash Chopra\'s Actresses Who Sizzled In White Dress On Silver Screen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: माधुरी, श्रीदेवी, रेखा, यश चोप्रांच्या सिनेमांमध्ये अभिनेत्री परिधान करायच्या व्हाइट ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
['मोहब्बतें'मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, 'दिल तो पागल है'मध्ये माधुरी दीक्षित आणि 'चांदनी'मध्ये श्रीदेवी]
मुंबईः बॉलिवूडच्या बागेला यश चोप्रा यांनी आपल्या दिग्दर्शनाने 53 वर्षे फुलवले. यश चोप्रा यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांनी बनवलेले अविस्मरणीय सिनेमे आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यश चोप्रा यांना दिग्दर्शकासोबतच, निर्माते आणि पटकथा लेखक म्हणून ओळखले जाते. 27 सप्टेंबर 1932 रोजी लाहोर (आता पाकिस्तानात) येथे जन्मलेल्या यशजींची आज 82वी जयंती आहे.
यश चोप्रा यांनी आपल्या करिअरची सुरुवात भाऊ बी.आर. चोप्रा यांच्यासोबत 1959 मध्ये 'धूल के फुल' या सिनेमाद्वारे केली होती. या सिनेमात माला सिन्हा, राजेंद्र कुमार आणि लीला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यश चोप्रा यांना पहिले मोठे यश हे 1973 मध्ये रिलीज झालेल्या 'दागः ए पॉयम ऑफ लव्ह' या सिनेमाद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी 'दीवार', 'कभी कभी', 'त्रिशूल', 'दूसरा आदमी', 'मशाल', 'फासले', 'विजय', 'चांदनी', 'लम्हे', 'परंपरा', 'डर', 'दिल तो पागल है', 'वीर जारा', 'जब तक है जान' यांसारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. 'जब तक है जान' हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
व्हाइट साडी, ड्रेसमध्ये सिल्व्हर स्क्रिनवर दिसायच्या अभिनेत्री
यश चोप्रा यांच्या प्रत्येक सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या सिनेमात अभिनेत्री व्हाइट ड्रेस नक्की परिधान करायच्या. त्यांचे असे मत होते, की सिनेमाच्या यशासाठी हे गरजेचे आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग यशस्वीसुद्धा ठरला.
'चांदनी' आणि 'लम्हें' या सिनेमांत श्रीदेवी, 'मोहब्बतें'मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, 'डर'मध्ये जुही चावला, 'दिल तो पागल है' या सिनेमात माधुरी दीक्षित, 'वीर जारा'मध्ये प्रिती झिंटा, 'साथिया'मध्ये राणी मुखर्जी, 'जब तक है जान' आणि 'मेरे ब्रदर की दुल्हन'मध्ये कतरिना कैफ, 'रब ने बना दी जोडी' या सिनेमात अनुष्का शर्मा, फनामध्ये काजोलने व्हाइट ड्रेस परिधान केला होता. यापैकी काही सिनेमे असे आहेत, ज्यामध्ये संपूर्ण सिनेमामध्ये अभिनेत्रीने पांढरे कपडेच परिधान केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यश चोप्रा यांच्या सिनेमातील अभिनेत्रींचा व्हाइट ड्रेसमधील लूक...