आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Death Anv: यश जोहर यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचले होते बॉलिवूड कलाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: पहिल्या छायाचित्रात आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेत करण जोहर आणि दुस-या छायाचित्रात यश जोहर यांच्या अंत्ययात्रेत पोहोचलेली प्रिती झिंटा.
मुंबई - यश जोहर यांनी अनेक प्रसिद्ध चेहरे बॉलिवूडला मिळवून दिले. पटकथा लिखाणापासून आपल्या करिअरला सुरुवात करणारे यश जोहर यांनी 'मुझे जीने दो', 'गाइड', 'ज्वेल थीफ', 'दोस्ताना' आणि 'कुछ कुछ होता है' यांसारखे अविस्मरणीय सिनेमे बॉलिवूडला दिले. 26 जून 2004 रोजी यश जोहर यांनी या जगाचा निरोप घेतला.
पटकथा लिखाणापासून करिअरला सुरुवात करणारे यश जोहर 1962 मध्ये सुनील दत्त यांच्या अजंता आर्ट्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहभागी झाले. 'मुझे जीने दो' या सिनेमाला मिळालेल्या यशात यश जोहर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर त्यांनी सहायक निर्माता म्हणून देवानंद यांच्या प्रॉडक्शनच्या 'गाइड', 'ज्वेल थीफ', 'प्रेम पुजारी', 'हरे रामा हरे कृष्णा' या सिनेमांसाठी काम केले. 1977 मध्ये यश जोहर यांनी धर्मा प्रॉडक्शन नावाने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले. या प्रॉडक्शनचा 'दोस्ताना' हा पहिलाच सिनेमा हिट ठरला होता.
'कुछ-कुछ होता है'ने पालटला धर्मा प्रॉडक्शनचा चेहरा
'अग्निपथ', 'गुमराह' आणि 'डुप्लीकेट'नंतर 1998 मध्ये रिलीज झालेला धर्मा प्रॉडक्शनचा 'कुछ-कुछ होता है' हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. या सिनेमाद्वारे यश जोहर यांचा मुलगा करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. या सिनेमात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मेन लीडमध्ये होते. ओवरसीज मार्केटमध्येही हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमामुळे धर्मा प्रॉडक्शनचे दिवस पालटले.
अनेक कलाकारांनी दिला होता यश जोहर यांना अखेरचा निरोप
कॅन्सरमुळे यश जोहर यांचे निधन झाले. यश जोहर यांच्या निधनाचे वृत्त पसरताच बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकाला अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूडमधील अनेक कलाकार पोहोचले होते.
बिग बी आहेत यश जोहर यांचे प्रशंसक
मेगास्टार अमिताभ बच्चन यश जोहर यांच्या प्रशंसकांपैकी एक आहेत. यश जोहर यांच्या आठव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बिग बींनी ट्विटरवर लिहिले होते, "आज निर्माता आणि धर्मा प्रॉडक्शनचे संस्थापक यश जोहर यांची पुण्यतिथी आहे. ते फिल्म इंडस्ट्रीतील सज्जन व्यक्ति होते. त्यांच्या बॅनरच्या 'दोस्ताना' या पहिल्या सिनेमात मी, शत्रुघ्न सिन्हा आणि झीनत अमान होतो. राज खोसला यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. यश जोहर यांनी माझ्यासोबत 'अग्निपथ' हा सिनेमा बनवला. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचे वडील यश जोहर यांचे 26 जून 2004 रोजी वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले."
अमिताभ यांचा ब्लॉग वाचून भावूक झालेल्या करणने ट्विटरवर लिहिले होते, ''माझ्या वडिलांना दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. तुमचा ब्लॉग वाचला, धन्यवाद अमित अंकल.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि 10 छायाचित्रांमध्ये पाहा यश जोहर यांचा अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेली गर्दी...