महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेलं कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय आणि सामाजिक जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या यशवंतरावांचा जीवनपट खूप रंजक असा आहे. त्यांच्या याच जीवनप्रवासावर आधारित यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या 14 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे.
जगप्रसिद्ध संतूरवादक पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते अलीकडेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले.
महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. चित्रपटात विविध बाजाची एकूण 16 गाणी असून ती अनेक नामवंत गायकांनी स्वरबद्ध केली आहेत.
या चित्रपटातील गाण्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...