(फाइल फोटो- दीपिका पदुकोण)
मुंबई: एका इंग्रजी वर्तमानपत्रात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या क्लीव्हेजचे एक छायाचित्र आणि बातमी छापून आली होती. ही बातमी पाहताच दीपिकाचा पारा चढला. कारण तो फोटो केवळ तिच्या क्लीव्हेजवरच फोकस करणारा होता.
या बातमीवर दीपिका भडकली आणि बातमी छापणा-या वर्तमानपत्राला आव्हान देऊन टि्वट केले, की 'मी एक महिला आहे. माझ्याकडे क्लीव्हेज आणि ब्रेस्ट आहे तुम्हाला काही अडचण आहे का?'
एवढेच काय, तिने त्या माध्यमाला स्पष्ट सांगितले, की महिलांचा सन्मान न करण्यांनी महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करू नये. दीपिकाने हे सर्व टि्वट 'फाइंडिंग फॅनी'च्या अकाउंटवरून केले आहेत.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणने अनिता श्रॉफ अदजानियाव्दारा डिझाइन केलेला लो कट ड्रेस 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला परिधान केला होता. यावेळी एका प्रसिध्द मीडिया हाउसने तिच्या क्लीव्हेजचे छायाचित्र क्लिक करून बातमी बनवली होती. दीपिकाने ही बातमी पाहताच तिचा पारा चढला.
चाहत्यांनीसुध्दा दिला दीपिकाला सपोर्ट
या प्रकरणात दीपिकाचे चाहते तिला सपोर्ट करताना दिसले. दीपिकाने या बातमीवर प्रखर प्रतिक्रिया देऊन टि्वट केले तेव्हा 60 मीनीटांत जवळपास 1550 लोकांनी त्याला रिटि्वट केले. बातमी प्रकाशित करणा-या वेबसाइटला उत्तर मागितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीपिका पदुकोणसह चाहत्यांचे, होमी अदजानिया आणि निर्माता रितेश सिधवानी यांनी केलेले टि्वट्स...