आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yookta Mookhey To Resolve Issues Amicably With Prince Pal Tuli

माजी जगतसुंदरी युक्ता पतीसोबत पुन्हा थाटू शकते संसार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी जगतसुंदरी युक्ता मुखी आणि तिचा पती प्रिन्स तुली यांच्यामध्ये चालू असलेल्या वादाने नवीन वळण घेतले आहे. त्या दोघांनी त्यांच्यात सुरु असलेल्या वादाला सामंजस्याने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत दोघांमधील होणा-या वादाला बघून वाटत होते, ते कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. परंतु मुंबई हायकोर्टाने त्यांच्यासाठी एका मध्यस्थ व्यक्तिची निवड केली आणि आता आपल्यातील वादाला मिटवण्याचा दोघांनी मनापासून निर्णय घेतला आहे.
या मध्यस्थाने अलीकडेच कोर्टाला संकेत दिले, की तो त्याच्या कामात यशस्वी झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी 26 मार्चला होणार आहे. त्यावेळी मध्यस्थ आपला अहवाल सादर करेल आणि प्रकरणावर चर्चा केली जाईल.
मागील वर्षी युक्ता मुखीने दाखल केलेल्या तक्रारीविरोधात प्रिन्स तुलीने हायकोर्टात जामीनाचा अर्ज केला होता. तुलीवर अनैसर्गिक लैंगिग संबंध आणि धमकी देण्याचे आरोप युक्ताने लावले होते. त्यानंतर हायकोर्टाने वकील राजीव पाटील यांची या दोघांमधील मध्यस्थ म्हणून निवड केली होती.
13 मार्चला पाटील यांनी दोघांतील वाद मि टवण्यात यश मिळाल्याची माहिती न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांना दिली. पाटील यांनी न्यायमूर्ती यांना अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. यावेळी प्रिन्सचे वकील फिल्जी फ्रेडरिक आणि युक्ताचे वकील तौबानी ईरानी हेसुध्दा तिथे उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा काय आहे हे प्रकरण? युक्ताचे बॉलिवूडशी काय नाते आहे आणि प्रिन्स तुलीशी कशी झाली तिची ओळख?