आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Man Arrested In Mumbai For Allegedly Threatening Madhuri Dixit

अभिनेत्री माधुरी दीक्षितला धमकावणारा तरुण अटकेत; मागितली होती खंडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवुडची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला खंडणी मागणार्‍या तरुणाला अटक करण्यात आले आहे. 23 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने गुरुवारी रात्री अटक केली. प्रवीणकुमार प्रधान असे आरोपी तरुणाचे नाव असून तो वेटर आहे. माधुरी दीक्षितला प्रवीणकुमारने धमकीचे चार एसएमएस पाठवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने माधुरीला धमकीचे चार एसएमएस पाठवले होते. एसएमएसमधून त्याने माधुरीकडे खंडणी मागितली होती. रुपये दिले नाही तर माधुरी आणि तिच्या मुलांची हत्या करण्यात येईल, असेही आरोपीने म्हटले होते. विशेष म्हणजे आपण गॅंगस्टर छोटा राजनसाठी काम करतो, असे आरोपीने म्हटले होते. माधुरीचा मोबाईक क्रमांक त्याने एका मॅग्झीनमधुन घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, काय आहे प्रकरण...