मुंबई: छेडछाड प्रकरणात एक प्रत्यक्षदर्शीने प्रिती आणि नेस वाडिया यांमध्ये झालेल्या बातचीतचा खुलासा केला आहे. हा प्रत्यक्षदर्शी त्यावेळी व्हिआयपी जागेवर बसलेला होता. त्याच ठिकाणी प्रिती आणि नेस यांचा वाद सुरू होता. प्रत्यक्षदर्शीनुसार, वाडिया प्रितीला म्हणाला, 'तू तुझा रंग दाखवला. त्यानंतर प्रिती भडकली.'
वाडिया आई आणि भाचीला जागी भेटली नाही म्हणून भडकला होता. कारण त्याने बुक केलेल्या सर्व जागांवर प्रितीचे जवळचे लोक बसलेले होते. आई आणि भाचीसाठी जागेचे व्यवस्था करून वाडिया वानखेडे स्टेडिअमच्या बाल्कनीमध्ये पोहोचला तिथेच प्रितीसुध्दा उभी होती.
प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्याप्रमाणे, स्टेडिअममध्ये खूप गर्दी आणि गोंधळ असल्याने वाडियाने प्रितीचा हात पकडून तिच्या कानात काहीतरी म्हणाला. या प्रकाराला तिने छेडछाडीचे नाव देऊन एफआयआर दाखल केली. प्रिती आणि वाडिया यांच्यामध्ये अशी बातचीत झाली...
वाडिया: काय चालू आहे इथे?
प्रिती: काय होताय म्हणजे, तुझा काय संबंध?
वाडिया: तू सर्व जागेवर कब्जा का केलास?
प्रिती: तू उशीरा आलास मी काय करू? मला काय माहित होते तुला इतके सीट हवेत?
वाडिया: आज माझा वाढदिवस आहे आणि तिला ठाऊक होते माझ्यासोबत आई येणार आहे. तिचे वय 71 वर्षे आहे आणि तिला अर्धा तास उभे राहावे लागले. तू तुझा खरा रंग दाखवला.
प्रिती: तू अशाप्रकारे माझ्याशी बोलू शकत नाही .
वाडिया: तू वास्तविकरित्या आदराच्या लायकीची नाहीस.
प्रिती: तू तुझी बकवास बंद कर.
वाडिया: तू फक्त स्वत:चे ऐकते. तू तुझा खरा रंग दाखवला.
'तू तुझा खरा रंग दाखवला' असे म्हणताच प्रितीचा रागाचा पारा चढला आणि ती भडकली. तिने आरडाओरडा करण्यास सुरू केला. दोघांमध्ये झालेला हा वाद तिथे उपस्थित अनेक लोकांनी बघितला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा काय आहे प्रकरण आणि प्रितीने FIRमध्ये कोणते मुद्दे दाखल केले...?