नेहमीच वेग-वेगळे रॅप तयार करून तरुणाईला भूरळ घालणारा हनी सिंग सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. यावेळी प्रसिध्द रॅपर हनी सिंग आता हिप-हॉपच्या माध्यमातून पुन्हा एकदा तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावणार आहे. म्यूझिक वर्ल्ड डेच्या (22 जून) दिवशी हनी सिंगने 'इसे कहते है हिपहॉप' हे रॅप साँग रिलीज केले. या गाण्याच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.
हे गाणे त्याने टी-सीरीजसह तयार केले. हनी सिंग गाण्यात त्याला कसे स्टारडम मिळाले याची कहानी मांडताना दिसत आहे. गाण्यात तो एकाच रंगाचे कपडे आणि सोन्याचे एक्सेसरीज घातलेला दिसत आहे. 3 मिनीट 21 सेकंदांचे हे गाणे हनी सिंगच्या मागील गाण्यांप्रमाणे हिट होऊ शकते असे संकेत आहेत.
या गाण्यात हनी सिंगसह आणखी एक देसी रॅपर लिल गोलूसुध्दा आहे. त्याचे शब्ददेखील हनीसिंगच्या शब्दांनी प्रेरित आहेत.
'इसे कहते है हिप-हॉप' नावाने रिलीज झालेला हनी सिंगचा हा दुसरा अल्बम आहे. यापूर्वी त्याचे 'ब्लू आइज' अल्बम रिलीज झाला होता. ज्याला लोकांनी बरेच पसंत केले होते. आजही तरुणाईच्या तोंडून त्या अल्बमचे बोल ऐकायला मिळतात.
हनीसिंगने बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
अक्षय कुमारच्या 'खिलाडी 786'मधील 'ओ बावरीया', 'बॉस'मधील 'पार्टी ऑल नाइट',
शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील 'लूंगी डान्स' तसेच
अमिताभ बच्चन यांच्या 'भूतनाथ रिटर्न्स'मधील 'पार्टी विथ भूतनाथ'सारख्या अनेक गाण्यांना आवाज आणि रॅप देऊन लोकांच्या मनात स्थान मिळवले. हनीसिंग एक पंजाबी गायक आहे. त्याने अनेक पंजाबी अल्बम काढले आहेत.