आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yuvraj, Harbhajan And Others At Music Day Live Concert Mehfil E Sartaaj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रांमध्ये पाहा, म्युझिक इवेंटमध्ये युवी-भज्जीसह आणखी कोणकोण झाले सामील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ऋषिता भट्ट, युवराजसिंग आणि हरभजनसिंग)
मुंबई - वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत पंजाबी म्युझिकल इवेंटचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सतिंदर सरताज यांनी आयोजित केला होता. यामध्ये बी टाऊनपासून ते क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींनी आपला सहभाग नोंदवला होता. महफिल-ए-सरताज नावाच्या या कार्यक्रमात स्टार क्रिकेटर युवराजसिंग, हरभजनसिंगसह बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा, ऋषिता भट्ट आणि कबीर बेदी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात युवीसह त्याची आई शबनम सिंग यादेखील कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी युवी ब्लू शर्ट, ब्लू जीन्स आणि व्हाइट ब्लेजरमध्ये दिसला. तर हरभजन ब्लॅक शर्ट आणि ग्रीन ट्राउजरमध्ये कार्यक्रमात पोहोचला होता. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल ऋषिता भट्ट यावेळी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने सिल्व्हर कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर हरभजनची कथित गर्लफ्रेंड गीता बसरा पारंपरिक सलवार ड्रेसमध्ये दिसली.
या कार्यक्रमात अभिनेता मुकेश ऋषी, रणविजय सिंह, मॉडेल आसिफ आजिम यांनीही आपला सहभाग नोंदवला होता. अभिनेता कबीर बेदी पत्नी परवीन दुसानीसह येथे आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा महफिल-ए-सरताजमध्ये सहभागी झालेल्या स्टार्सची छायाचित्रे...