आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा-झहीरच्‍या प्रेम कहाणीचा अखेर दी एण्ड...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा अव्‍वल गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा शर्वाणी यांच्‍यातील रोमान्‍स संपुष्‍टात आला आहे. काही दिवसांपूर्वी दोघे लवरकच विवाहबंधनात अडकणार असल्‍याच्‍या बातम्‍या प्रसारमाध्‍यमांमध्‍ये झळकल्‍या होत्‍या. परंतु, खुद्द ईशानेच ब्रेकअप झाल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे 8 वर्षे चाललेल्‍या या प्रेम कहाणीचा अंत झाला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये ईशाने झहीरसोबत ब्रेकअप झाल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तिने सांगितले की, सध्‍या मी सिंगल आहे. झहीरसोबतचे नाते संपुष्‍टात आले आहे. आम्‍ही दोघे केवळ मित्र आहोत. मिडीयामध्‍ये आलेल्‍या बातम्‍या अतिशय चुकीच्‍या होत्‍या. मला त्‍यासंदर्भात तेव्‍हा काहीही बोलायचे नव्‍हते. म्‍हणून मी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
ब्रेकअपचे कारण मात्र ईशाने स्‍पष्‍ट केले नाही. गेल्‍या वर्षी विश्‍वचषक आणि आयपीएलमध्‍ये ती झहीरला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी प्रत्‍येक सामन्‍यांमध्‍ये उपस्थित होती. परंतु, यावर्षी ती अनुपस्थित होती. सध्‍या ईशा 'झलक दिखला जा' या डान्‍स रियालिटी शोमध्‍ये व्‍यस्‍त आहे.
ईशा शर्वाणीचं झाडाला लटकणं झालंय सफल
झहीर खानने गिरवला धोनी-भज्जीचा कित्ता