आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोण होईल मराठी करोडपती'च्या HOTSEAT वर महेश कोठारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'कोण होईल मराठी करोडपती' या शोच्या हॉटसीटवर प्रेक्षकांना लवकरच दिसणार आहेत निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता महेश कोठारे. आपल्या आगामी 'झपाटलेला 2' थ्रीडी या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने महेश कोठारे यांनी सिनेमात मेन लीडमध्ये असलेल्या आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णीबरोबर या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी महेश कोठारे यांनी सचिन खेडेकरांच्या प्रश्नांची उत्तरं देत एक लाख साठ हजार इतकी रक्कम जिंकली. ही संपूर्ण रक्कम महेश कोठारे यांनी आदिपथ ट्रस्टला मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या शोविषयी महेश कोठारे यांनी सांगितले की, ''या हॉटसीटवर बसणं म्हणजे एक थरारक आणि उत्कंठा वाढवणारा अनुभव होता. त्याहीपेक्षा एखाद्या संस्थेसाठी खेळणं ही खूप मोठी जबाबदारी होती. मी खूप आभारी आहे की, कोण होईल मराठी करोडपतीच्या माध्यमातून मी त्यांच्यासाठी थोडे काही करु शकलो.''

चला तर 'कोण होईल मराठी करोडपती'चा झपाटलेला 2' स्पेशल एपिसोड नक्कीच एन्टरटेनिंग असेल अशी आशा व्यक्त करुया.