आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे अभिनेत्री जरीन खान रुग्णालयात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला उलट्या होत असल्यामुळे तत्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरीनच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झाले असे, की जरीन आपल्या आगामी पंजाबी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पंजाबमध्ये
गेली होती. तेथून परतल्यानंतर तिने कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये लंच करण्याचे ठरवले. मात्र जेवण झाल्यानंतर तिला उलट्यांचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर तत्काळ तिला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिला अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पुढील आठवडाभर जरीनला रुग्णालयातच थांबावे लागणार आहे.