आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी सिने अवॉर्ड्समध्‍ये शाहरूख- प्रियंकाने आणली रंगत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकाऊ- जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मकाऊमध्‍ये शनिवारी 'झी सिने अवॉर्ड्स'दरम्‍यान बॉलिवूड कलाकारांनी रंगत आणली. शाहरूख आणि प्रियंकाचे धमाल सूत्रसंचालन, कॅटरीना कैफ, रणबीर कपूर आणि शाहिद कपूरचे नृत्‍य सादरीकरणाने मकाऊकरांचे मन जिंकले.
शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा यांनी विनोदी शैलीत, सेलिब्रिटींच्‍या कानपिचक्‍या घेत सूत्रसंचालन केले. त्‍यांनी सिनेरसिकांना खूप हासवले. शाहरूख मंचावर येताच प्रेक्षकांनी ओरडून त्‍यांचा आनंद व्‍यक्‍त केला. हे पाहून शाहरूखच्‍या अंगातही उत्‍साह संचारला. त्‍याने 'डॉन-2'मधील गाण्‍यावर नृत्‍य सादर केले. सध्‍या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्‍या 'चिकनी चमेली' या आयटम सॉंगवर नृत्‍य करत कॅटरीना कैफने समारंभात बहार आणली. त्‍यानंतर रणबीर कपूर आणि शाहिद कपूर यांच्‍या 'याहू...चाहे कोई मुझे जंगली कहे..' या गाण्‍यावरील नृत्‍याने प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावला.
या सोहळ्यास ऋषी कपूर, जितेंद्र, फरहान अख्‍तर, आदी दिग्‍गज कलाकार आले होते.

मकाऊतील 'द वेनिशियन हॉटेल' सजले:
येथील प्रसिद्ध हॉटेल 'द वेनेशियन'मध्‍ये आयोजित या समारंभासाठी भव्‍य मंच उभारण्‍यात आला होता. मंचाच्‍या पाठीमागे दिव्‍यांच्‍या लखलखाटाने सजलेले संपूर्ण मकाऊ शहर दिसत होते. एकीकडे भव्‍य समारंभ आणि दुसरीकडे शहराचे विहंगम दृश्‍य बघताना सर्वांचेच डोळे दिपून गेले.

अशी आहेत नामांकने:
सर्वोत्‍कृष्‍ट चित्रपट-
बॉडीगार्ड, सिंघम, डॉन-2, रा-वन, द डर्टी पिक्‍चर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, रॉकस्‍टार

सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री-
कंगना- तनू वेड्स मनू, करीना कपूर- बॉडीगार्ड, कॅटरीना कैफ- जिंदगी ना मिलेगी दोबारा, प्रियंका चोप्रा- सात खून माफ, विद्या बालन- द डर्टी पिक्‍चर

सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता-
ऋतिक रोशन- जिंदगी ना मिलेगी दोबारा, अजय देवगण- सिंघम, रणबीर कपूर- रॉकस्‍टार, सलमान खान- बॉडीगार्ड, शाहरूख खान- डॉन2 आणि रा वन
\'झी सिने अवॉर्ड्स\' साठी बॉलिवूडकर सज्‍ज (फोटो फिचर)