आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झी गौरव पुरस्कार नामांकन: ‘काकस्पर्श’, ‘बीपी’मध्ये चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- झी समूहातर्फे मराठी चित्रपट, नाटकांतील उत्कृष्ट कलाकृतींना दरवर्षी झी गौरव पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी ‘काकस्पर्श’ आणि ‘बालक पालक’ चित्रपटांमध्ये खरी चुरस असून ‘संहिता’, ‘आयना का बायना’ आणि ‘तुकाराम’ हे तीन चित्रपटही स्पर्धेत आहेत. शुक्रवारी रात्री झी गौरव पुरस्काराची नामांकने जाहीर करण्यात आली. व्यावसायिक नाट्य विभागामध्ये ‘गांधी आडवा येतो’, ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘सगळे उभे आहेत’, ‘टॉम आणि जेरी’ आणि ‘बेचकी’ यांच्यात लढत आहे, तर प्रायोगिक नाटकांमध्ये ‘गायब गीत’, ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’, ‘सायलेंट स्कीम’, चित्र गोष्टी’ आणि ‘घरबार’ यांच्यात चुरस आहे.


उत्कृष्ट अभिनेता- सचिन खेडेकर (काकस्पर्श), जितेंद्र जोशी (तुकाराम), गिरीश कुलकर्णी (मसाला), तुषार दळवी (श्यामचे वडील), विक्रम गोखले (अनुमती).


उत्कृष्ट अभिनेत्री- अमृता सुभाष (मसाला), रेणुका दफ्तरदार (संहिता), सुप्रिया विनोद (इन्व्हेस्टमेंट), प्रिया बापट (काकस्पर्श), वीणा जामकर (कुटुंब).


उत्कृष्ट दिग्दर्शक- महेश मांजरेकर (काकस्पर्श), चंद्र्रकांत कुलकर्णी (तुकाराम), सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर (संहिता), समीत कक्कड (आयना का बायना), रवी जाधव (बालक पालक).


उत्कृष्ट संकलन - राहुल भातणकर (आयना का बायना), मोहित टाकळकर (संहिता), जयंत जठार (बालक पालक), महेश लिमये (बालक पालक), उत्कृष्ट कलादिग्दर्शन- नितीन देसाई (अजिंठा), एकनाथ कदम- (तुकाराम).


उत्कृष्ट पार्श्वगायिका- हमसिका अय्यर (मन चिंब पावसाळी- अजिंठा), राजश्री पाठक (कुठे पाठ फिरवुनी- काकस्पर्श) आणि ऊर्मिला धनगर, कल्याणी साळुंके (जगजेठी- अजिंठा).


उत्कृष्ट पार्श्वगायक- सुरेश वाडकर (शब्दांत गोठले- अजिंठा), अनिरुद्ध जोशी- (वृक्षवल्ली आम्हा- तुकाराम), शेखर रावजी अणे- (हरवली पाखरे- बालक पालक).